उमरडच्या शेतकऱ्यांना सदगुरु कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी दिले माती परीक्षणाचे धडे
उमरड(नंदकिशोर वलटे) करमाळा तालुक्यातील उमरड येथे ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत मिरजच्या सद्गुरू कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी शेतकऱ्यांना माती परिक्षणाबद्दल माहिती दिली.यावेळी त्यांनी मातीचा नमुना गोळा करण्याच्या पध्दती, माती परीक्षण गरज व मृदा स्वास्थ कार्ड योजना समजावून सांगितली. तसेच शिवशंकर माती परीक्षण केंद्रात माती परिक्षणाचे व तपासणीचे कार्य कसे चालते याची माहिती दिली.
या वेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प कार्यासाठी आलेल्या कृषीदूतांना संस्थापक डॉ.शंकरराव नेवसे,अध्यक्षा कल्याणी नेवसे,सचिव राजेंद्र गोरे,प्रशासन अधिकारी सखाराम राजळे,समन्वयक प्रा.सूरज जाधव,प्राचार्य डॉ. रामदास बिटे,कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवम यादव व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी कृषीदूत विराज वाबळे,केशव पवार,विशाल शेटे,वैभव झाम्बरे,गौरव पुराणे,प्रतीक वाघुले यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण स्वास्थ कार्ड शेतकऱ्यांना वाटप केले.