उमरडच्या विजया वलटे व भारती पाखरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

उमरडच्या विजया वलटे व भारती पाखरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

उमरड(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल उमरडच्या विजया नंदकिशोर वलटे व भारती महेंद्र पाखरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर दिला गेला.ग्रामीण भागात महिला व बालक यांच्या उन्नती साठी प्रयत्न करणाऱ्या महिलांची निवड करून यंदाचा हा पुरस्कार देण्यात आला आहे.पुरस्कार विजेत्या विजया वलटे यांनी गावात महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले तसेच हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना बचत व लघुउद्योग यासाठी कर्ज उपलब्ध करून दिली.

महिला व बालकांच्या आरोग्य जागृतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, नवरात्र उत्सवात महिला सन्मानाचे संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि लेडीज शॉपी सुरू करून स्वतः स्वयं रोजगार निर्माण केला तर भारती पाखरे यांनी गावातील बचत गटाच्या माध्यमातील शंभर महिलांना सहभागी करून स्वावलंबी बनवले आणि बचत गटांच्या सीआरपी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे केले आहे. पुरस्काराचे वितरण उमरड ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून पुरस्कार विजेत्या विजया वलटे यांना अंगणवाडी सेविका रंजना पाखरे व भारती पाखरे याना ललिता वलटे या महिलांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ,हार, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम पाचशे रुपये असे होते.

हेही वाचा – प्री-वेडिंग फोटो शूटिंगवर सोलापूर जिल्हा मराठा समाजाची बंदी; सोलापूरात मराठा वधू वर परिचय मेळ्यावत ठराव

अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

या कार्यक्रमासाठी सरपंच बापूराव पडवळे, मा.सरपंच बापूराव चोरमले,उपसरपंच मुकेश बदे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक हनुमंत चव्हाण,प्रा. नंदकिशोर वलटे, ग्रामविकास अधिकारी भालेराव यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

karmalamadhanews24: