उजनी जलाशयातील जलवाहतूक ठप्प; विद्यार्थी, नागरिकांचे हाल; नियम व अटी घालून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी
केत्तूर (अभय माने) २१ मे रोजी घडलेल्या बोट दुर्घटने पासून उजनी जलाशयातील कुगाव ते शिरसोडी ,कुगाव ते कालठण , चिखलठाण ते पडस्थळ ,ढोकरी ते गंगावळण , पोमलवाडी ते चांडगाव आदी मार्गावरील जलवाहतूक बंद आहे .
सध्या नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असून करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील शेकडो विदयार्थी – विद्यार्थिनीं शिक्षणासाठी इंदापूर तालुक्यात दररोज ये -जा करणारे आहेत .
या परिसरातील नागरिक वैद्यकिय उपचारासाठी इंदापूर , अकलुज व बारामती येथे जातात . टेंभूर्णी मार्गे अथवा राशीन भिगवण मार्गे जवळपास 90 /100 किमी अंतर जावे लागते म्हणून या जलाशयात मंजूर पूल पूर्णत्वास येईपर्यंत ही जलवाहतूक चालु असणे आवश्यक आहे .
बोट चालकांना नियम वअटी – शर्ती घालुन व प्रवाशांच्या सुरक्षीततेची साधने सक्तीची करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींच्या मजबूतीबाबत व सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी करावी .
हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार
कारण ही वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे जर ही जलवाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली तर सर्वांना दिलासा मिळेल . असे मत भाजपा जिल्हा यूवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे .