लाडकी बहीण लाडका भाऊ आहे मग लाडका शेतकरी का नाही ?
केत्तूर ( अभय माने) निवडणुकीच्या धामधुमीत साखर कारखानदारणा ऊस ऊत्पादकांच्या दिवाळीचा विसर पडला आहे .एक प्रकारे कारखानदारांनी आपल्या लाडक्या ऊस उत्पादकांना दिवाळीमधे ऊस बिल न देंता ठेंगाच दाखवील्याची नदी काठावरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधे सुरु आहे.
विशेता करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामधे मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे ऊत्पादन घेतले जाते . हा ऊस श्री.अंबालीका शुगर, बारामती ऑग्रो ,गौरी शुगर हीरडगाव , भैरवनाथ शुगर विहाळ या कारखान्यांना गाळपासाठी गेला आहे.
दीवाळीमधे दरवर्षी 100 ते 150 रुपये प्रती टन ऊस बिल मिळत असते .मात्र मागील 2023-24 च्या गाळपास गेलेल्या ऊसाला अंबालीका शुगर व बारामती ऑग्रो यांनी 2900 तर गौरी शुगर हीरडगाव ने 3006 रूपये दर आतापर्यंत दीला आहे.
दीवाळीमधे दीडशे ते दोनशे रुपये ऊसबिलाची अपेक्षा उत्पादकांकडून असते.मात्र अद्याप ऊस बिल न दिल्याने ऐन दिवाळीत बाजारपेठेत ऊत्साह दिसत नाही. व 2024-25 चा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी दिवाळीतील उस बीलं शेतकऱ्यांना द्यावीत ही विनंती
महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी
” सरकारचे सर्व घटक लाडके आहेत. मग ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारांचे लाडके नाहीत का ? करखाना व्यावस्थापनाने दीवाळीकरीता दीडशे ते दोनशे रूपये प्रती टन ऊस बिल शेतकर्यांच्या खात्यवर वर्ग करून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करावी .
– करण विठ्ठल निकम. ऊसउत्पादक शेतकरी केत्तूर ( भाजप युवा मोर्चा तालुका सचिव करमाळा )