तरुणांनो रागावर नियंत्रण ठेवा; केतूर येथे कीर्तनात महाराजांचा संदेश

तरुणांनो रागावर नियंत्रण ठेवा; केतूर येथे कीर्तनात महाराजांचा संदेश

केत्तूर(अभय माने) सध्या अनेकदा रागाच्या भरात आघाडीत घटना घडत आहेत त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे विशेषता तरुण वर्गाने रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन हभप विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगावकर (कर्जत) यांनी केले ते केत्तूर (ता. करमाळा) येथील महाशिवरात्रीनिमित्त श्री किर्तेश्वर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शनिवार (ता.9) रोजी काल्याच्या कीर्तनात बोलत होते.

पुढे बोलताना कोरेगावकर महाराज म्हणाले की, आपल्या चुकीच्या बोलण्याने आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि वडिलांची मान खाली जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

हेही वाचा – कोंढेज येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

कोरेगावकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता सांगता झाली.सप्ताहामध्ये श्री कीर्तेश्वर देवस्थान कमिटीने चोख नियोजन केल्याने आलेल्या भावीक भक्तांना दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

karmalamadhanews24: