तालुक्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा

तालुक्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा

केत्तूर (अभय माने) चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हिंदु नववर्षाचा प्रारंभ, मराठी नववर्ष नवीन महिना. यावर्षी दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता.9) मोठ्या उत्साहात व आनंद साजरा करण्यात आला.

सूर्योदयापूर्वी गुढी उभारली गेली.झेंडूच्या फुलांचा हार बांधला गेला या गुढीवर तांब्याचा कलश ठेवून गुढी उभारली गेली. (काही ठिकाणी भगवे झेंडे उभारून गुढी उभारण्यात आली होती.) गुढी भोवती सडा संमार्जन करून रांगोळी काढण्यात आली होती. घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले होते. गुढीची विधिवत पूजाअर्चा करून नारळ फोडण्यात आला. गुळ, हरभरा डाळ व लिंबाचा मोहर एकत्र करून त्याचा प्रसाद केला गेला व तो वाटण्यात आला दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला ठेवण्यात आला.

नवीन वर्षाचा प्रारंभ. नवीन खरेदी तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात काही केली गेली. सोन्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ते 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने सोने खरेदीकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.गुढीपाडवा हा दिवस ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हापासून नवीन वर्षाची सुरुवात होते अशी आख्यायिका आहे.

नेते मंडळी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत तर सर्वसामान्य जनता मात्र गुढीपाडव्याच्या तयारीत असल्याचे चित्र होते.शेतमजूर सध्या हाताला काम नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे भाजीपाला इतर धान्याला दर नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे त्यातच ऊस जाऊन दोन-तीन महिने झाले तरी उसाचे दर मिळाले नाही.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी बाजारपेठा थंडगार पडत आहेत त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. तर दुष्काळ निधी आला असलातरी सर्वर डाऊन मुळे त्यास विलब होत आहे.

गुढीसाठी लागणारे साखरेचे हार सोमवारी 80 रुपये किलोने विकले गेले होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line