श्रीराम प्रतिष्ठानकडून गणेश उत्सव बंदोबस्तातील पोलीस बांधवांना सालाबाद प्रमाणे मोफत जेवण

श्रीराम प्रतिष्ठानकडून गणेश उत्सव बंदोबस्तातील पोलीस बांधवांना सालाबाद प्रमाणे मोफत जेवण

करमाळा – श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश उत्सव बंदोबस्तातील पोलीस बांधवांना मोफत जेवण देण्यात आले,गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलीस बांधवांना नेमलेल्या ठिकाणाहून कुठेही जाता येत नाही व मिरवणुकीमुळे शहरातील हॉटेल व दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणाची अडचण निर्माण होते, ही बाब लक्षात घेऊन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दरवर्षी करमाळा येथे बंदोबस्तातील सर्व पोलीस अधिकारी, होमगार्ड व कर्मचाऱ्यांना मोफत जेवणाचे पॅकिंग पार्सल पुरवले जाते .


यंदाही गणेश उत्सव बंदोबस्तातील 150 अधिकाऱ्यांना श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवण देण्यात आले,
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास जाधव, भीष्माचार्य चांदणे सर , अमोल पवार, शिवाजी कुंभार, महादेव गोसावी, संतोष जवकर, गणेश गोसावी, तुषार कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे पोलीस

देवडीचे डॉ.ओंकार थोरात यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग-1 पदी निवड

श्रीराम प्रतिष्ठान व गणेश चिवटे यांची पोलीस बांधवांबद्दल असलेली आपुलकी व त्यांचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असून करमाळा पोलीस स्टेशनचे आम्ही सर्व अधिकारी त्यांचे आभारी आहोत
(पोलीस निरीक्षक – करमाळा
श्री.जोतिराम गुंजवटे )

karmalamadhanews24: