श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम मधील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीला उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम मधील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीला उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड होऊन इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 उत्तंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनींने मेरीटमध्ये येऊन इस्रो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी मिळणार आहे.
उत्तुंग तेज फाउंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर हलगे, परीक्षा प्रमुख चंद्रकांत शिंदे, प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीचा आणि पालक सौ माधुरी होरणे यांचा नारळ , श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करणारे श्री हिरवे एन.बी सर यांचाही सत्कार करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर वस्ताद, सौ. पल्लवी सचिन रणशृंगारे, सचिन रणशृंगारे यांनी अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात या विद्यार्थिनीने चांगले यश संपादन केल्यामुळे विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे.