माढा शैक्षणिक सोलापूर जिल्हा

 श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

माढा प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री भारत (आप्पा) घाडगे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब यांनी केले.श्री भारत (आप्पा) घाडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्यदिनाच्या घोषणांनी उपळाईचा आसमंत दुमदुमून गेला होता.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली.तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गीतावर नृत्याविष्कार सादर केला.त्याला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.सर्व देशभक्तीवरील भाषणे,गीतगायन व नृत्याविष्काराला उत्स्फूर्त दाद म्हणून उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तसेच बालकलाकारांना 6000 रुपये रोख पारितोषिक देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सादरीकरण केल्याबद्दल विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख श्री शब्बीर तांबोळी सर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट अशा रांगोळीचे रेखाटन सर्व महिला शिक्षकांनी केले.सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी उपळाई बुद्रुकच्या सरपंच सौ.सुमनताई माळी मॅडम,स्कूल कमिटीचे चेअरमन श्री सिताराम (बापू) गायकवाड,स्कूल कमिटीचे सदस्य ॲड.श्री नानासाहेब शेंडे (वकिलसाहेब),उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच श्री मनोहर (आबा) गायकवाड, श्री अजितसिंह देशमुख साहेब,उपळाई बुद्रुकचे उपसरपंच प्रतिनिधी श्री बसवराज आखाडे सर,सेवानिवृत्त मेजर श्री बाळू नागटिळक साहेब,श्री विनोद वाकडे,रासपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री गोरख वाकडे,

हेही वाचा – सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

उपळाई बुद्रुकचे पोलीस पाटील श्री जावेदभाई तांबोळी, विद्यालयाचे माजी शिक्षक श्री रामचंद्र माळी सर,श्री औदुंबर माळी,श्री दत्तात्रय राऊत,श्री बाळू जाधव,श्री अश्वमेध बाबर,श्री बाळू शिंदे,श्री रामेश्वर राऊत,श्री दत्तात्रय शिंदे,श्री अतुल क्षिरसागर सर,श्री प्रवीण नारायणकर सर,नूतन नगरअभियंता प्रतिक वाकडे,पोस्टमास्तर श्री मनोजकुमार शेटे,श्री सोमेश्वर शेंडे,आशा कार्यकर्त्या सौ.मिनाक्षी गाडेकर मॅडम,विशाल वाकडे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच बहुसंख्या ग्रामस्थ आदी उपस्थित होते.श्री शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले तर श्री मकरंद रिकिबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!