श्री गणेशा नंतर गौराई चे ही घरोघरी उत्साहात स्वागत
केत्तूर (अभय माने) लाडक्या गणेश आगमनानंतर गुरुवार (ता,21) रोजी गौरीचेही दुष्काळी परिस्थिती असतानाही मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने आगमन करण्यात आले.
लक्ष्मीचे आगमन झाले गुरुवार तारीख 21 रोजी सोन पावलांनी लक्ष्मी घरोघरी दाखल झाली लक्ष्मी सुख समृद्धीने आली लक्ष्मी माणिक मोत्यांनी आली अशी म्हणत वाजताच्या वातावरणात घरोघरी गौरीची स्थापना करण्यात आली आता तीन दिवस या उत्साह घरोघरी आनंदाने आनंदाची वातावरण असते असे महिला मंडळी सांगतात.
21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन सोळा पर्यंत गौरींचे आगमन घरोघरी करण्यासाठी गडबड सुरू होती
त्यानंतर शुक्रवार (ता.22 ) रोजी गौरीपूजन व नैवेद्य दाखवण्यात येणार आहे त्यानतंर शुक्रवार (ता.23 ) रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.56 पर्यंत गौरी विसर्जन होणार आहे.यावेळी घरोघरी विद्युत माळांचे डेकोरेशन गौरी समोर करण्यात आले होते तसेच गौरीभोवती आकर्षक सजावटही करण्यात आली होती.
हेही वाचा – दहा हजारांची लाच घेताना करमाळ्यात कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडले
व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर
गौरी सण हा उत्साह उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा होतो या सणावर यावर्षी दुष्काळाचे सावट आहे तरीही उत्साह मात्र कमी झाला नव्हता.भरपूर पाऊस पडू दे ! अशी प्रार्थना यावेळी गौरी समोर करण्यात आली.