शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

देहू – संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे (वय-३०) यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने खळबळ उडाली असून हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.

हेही वाचा – पोफळजच्या हळदी-कुंकू समारंभात माता पालकांसह जेष्ठ व विधवा महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग . मनोरंजनात्मक स्पर्धा : विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान 

खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे – उदयसिंह मोरे पाटील

दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टीळासुध्दा झाला होता.
“ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असतं. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line