शासनाचे अर्थसहाय्य मिळवून देणारी प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी – प्रियांका गायकवाड

शासनाचे अर्थसहाय्य मिळवून देणारी प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी – प्रियांका गायकवाड

करमाळा ( अभय माने)- करमाळा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा सर्वसामान्य नागरिकाना अर्थसहाय्य देणाऱ्या योजनाची नवीन प्रकरणे मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने करमाळा शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी नायब तहसिलदार यांच्या निदर्शनास लेखी निवेदनाद्वारे आणून दिले.


यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या सर्वसामान्याना अर्थसाहाय्य मिळवून देणाऱ्या योजनाच्या मंजुऱ्या फक्त बैठकी विना अधुऱ्या राहिल्या होत्या. माहे नोव्हेंबर २०२३ मधील बैठकीत नवीन प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यानंतर मात्र आजतागायत प्रकरणे मंजुरीसाठी एकही बैठक झाली नसल्याचे नायब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

तहसीलदार यांनीही याबाबत संबधित अधिकाऱ्यासोबत बोलणी करून लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच नायब तहसीलदार यांनी यापुढे स्वतः जातीने लक्ष घालून कोणालाही त्रास होणार नाही व सर्वसामान्याना शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही असे आश्वासन दिले.

हेही वाचा – पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

यावेळी शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, महिला आघाडी शहर प्रमुख गिता हेंद्रे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, युवा सेना तालुका उपप्रमुख दादासाहेब तनपुरे,
शहर संघटिका रूपाली शिंदे, शाखा प्रमुख मनिषा कारंडे, सविता सुरवसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

karmalamadhanews24: