शनेश्वर देवस्थान परिसर पोथरे गावात प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

शनेश्वर देवस्थान परिसर पोथरे गावात प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

करमाळा(प्रतिनिधी); शनेश्वर देवस्थान पोथरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले.शनेश्वर देवस्थान पोथरे येथील ग्रामस्थ भाविकांना बसण्यासाठी बाकडे मंदिर सुशोभीकरण निसर्गारम्य परिसर करण्यासाठी वृक्षारोपण प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. शनेश्वर देवस्थान ट्रस्ट पोथरे ग्रामस्थांच्या वतीने प्रा. रामदास झोळ सर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास अदिनाथचे मा.संचालक एकनाथ झिंजाडे खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन प्रभाकर शिंदे,मा.सभापती किसन आण्णा शिंदे,दादासाहेब झिंजाडे,मकाईचे मा.संचालक हरिभाऊ झिंजाडे,जेष्ठ नागरिक प्रेमराज शिंदे, पोलीस पाटील संदीप शिंदे पाटील, शनिश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आजिनाथ कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे ,

जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे ग्रामपंचायत सदस्य संतोष ठोंबरे, तानाजी देशमुख ,सुधीर साळुंखे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा अध्यक्ष अमोल घुमरे गोपीनाथ पाटील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.रामदास झोळ सर म्हणाले की करमाळा तालुक्यातील शनेश्वर देवस्थान प्राचीन पुरातन जागृत देवस्थान असून शनेश्वराची पूर्णाकृती मूर्ती असलेले भारत देशातील एकमेव ठिकाण आहे .

शनेश्वर देवस्थानच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातुन निधी मिळवुन देण्यासाठी लोकसहभागातून पोथरे गावाचे प्रश्न मार्गी लावून लावण्यासाठी प्रयत्न करू असे मत प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केले.

शनेश्वर देवस्थान पोथरे मंदिर परिसरातील नागरिकांना व भाविकांना अल्हाददायक वातावरण निर्मितीसाठी निसर्गाचे सानिध्य लाभाण्यासाठी परिसरात 28 वृक्षांची लागवड वृक्षरोपण करून प्राध्यापक रामदास झोळ सर व मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 27 जाळ्याचे ट्री गार्ड देण्यात आले. भाविक भक्तांसाठी नागरिकांसाठी विसाव्यासाठी बसण्यासाठी पाच बाकडे देण्यात आले.

हेही वाचा – सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहिर ; क्लिक करून वाचा नावे

ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

या कार्यक्रमास सोमनाथ आबासाहेब झिंजाडे, विशाल शिंदे, राज झिंजाडे, अक्षय जाधव, अमोल रोही, हरिभाऊ आढाव, अजित गोसावी, लक्ष्मण शिंदे ,बबन जाधव, तुकाराम नायकुडे संतोष ठोंबरे, बाळू कुलकर्णी, बबन शिंदे, सुभाष शिंदे ,आजिनाथ झिंजाडे अरुण झिंजाडे ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line