शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक कशासाठी ? वाचा सविस्तर लेख!

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक कशासाठी ? वाचा सविस्तर लेख!

शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यासाठी अनेक विषय आहेत, मनुस्मृतीमधील श्लोकच का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.भाषा विषयांच्या विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते पंचवीस मनाचे श्लोक,सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवत गीतेतील बारावा अध्याय पाठांतराची स्पर्धा आयोजित करावी विज्ञान, गणितात ही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करावा.असा प्रस्ताव करण्यात आला आहे .


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चे दहन का केले हा मुद्दा वेगळा.
जगातील इतर देश महासत्तेकडे वाटचाल करीत असताना आम्ही मात्र पुन्हा आमच्या तरुण पिढीला अधोगतीच्या मार्गाने न्हेत चाललो आहोत.. शालेय अभ्यास क्रमात खरे तर तांत्रिक,वैज्ञानिक, टेक्निकल,वैद्यकीय शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला तरच पुढील पिढी आदर्श घडेल व भारत देशाचे नांव प्रगत देश म्हणून जगात उल्लेख होईल.
मनुस्मृती जी एक विषमतेची दरी निर्माण करते त्या ग्रंथातील काही श्लोक अभ्यासक्रमात घेणे म्हणजे विषमतेला खतपाणी घालणे होय ,समता,बंधुभाव नष्ट करणे,धर्मांधता वाढविणे नाही का ? देशात अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत.सर्वांच्या धार्मिक रूढी परंपरा वेगवेगवळ्या आहेत परंतु सर्वांना समतेच्या एकात्मतेच्या बंधनात बांधणारा एकमेव ग्रंथ  संविधान आहे. प्रत्येकाने संविधानाची मूल्ये जपलीच पाहिजेत यातच देशाचे हित समावले आहे.
तसेच महत्वाचा मुद्दा हा ही आहे की (*संविधान च्या अनुच्छेद 28 मध्ये असे नमूद केले आहे की शैक्षणिक संस्थे मध्ये कोणत्याही धार्मिक सूचना दिल्या जाऊ शकतं नाहीत ज्याची संपूर्ण देखभाल राज्याच्या निधीमधून केली जाते*. मग एका धर्माचा भाग अभ्यासक्रमात रेटणे म्हणजे देशात प्रत्येक क्षेत्रात होणाऱ्या हुकूमशाही चाच हाही एक भाग.
प्रगत देशाचे शास्त्रज्ञ किती पुढे जात आहेत आणि आपण मात्र धार्मिक कुरघोड्या करण्यातच अडकलो आहोत. मुलांना कोवळ्या मनांना धर्माच्या बेड्यात अडकवू नका…जोपर्यंत हि विचारसरणी बदलत नाही तो पर्यंत आपल्या देशाचा विकास व प्रगती होणार नाही.

हेही वाचा – सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

शालेय जीवनात मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या. आजच्या पिढीची ढासळलेली नैतिक मूल्ये, कमी झालेला संयम, हिंसत्रक प्रवृत्ती, पालकांविषयी कमी झालेला आदर हे सर्व पाहता त्यांना मानसशास्त्र चे धडे दिले जावेत, नैतिक मूल्ये वाढवणारा अभ्यासक्रम हवा, जो कोण्या एका धर्माच्या चौकटीतील नसावा,जेणेकरून त्यापासून त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्वाचा भक्कम पाया उभा राहिल.
हे श्लोक पाठांतर करून ना त्याचे पोट भरणार आहे ना त्याचे भविष्य घडणार आहे. शासनाने मुलांना शिक्षण असे द्यावे की शिक्षण पुर्ण झाल्यावर तो स्वतः स्वावलंबी झाला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मना मनात तंत्रज्ञान, विज्ञान रुजले पाहिजे.
धर्म ज्ञान ज्यांना घ्यायचे आहे त्यांच्यासाठी धर्मशाळाची दारे खुली आहेतच. मग सर्वांसाठी सक्ती करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

नूरजहाँ फक्रृरूद्दीन शेख
गणेशगांव
ता.माळशिरस जि.सोलापूर

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line