करमाळा तालुक्यातील सातोली येथील शाळेत शिक्षकाची नेमणूक करावी; गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील सातोली येथील शाळेत शिक्षकाची नेमणूक करावी; गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

केम (प्रतिनिधी संजय जाधव); करमाळा तालुक्यातील सातोली येथील जि,प,शाळेत शिक्षक नेमणूक करावी असी मागणी युवा नेते अमर साळुंखे यानी गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांच्या कडे समक्ष निवेदन देऊन केली आहे.

या वेळी संदिप साळुंखे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, भाजपाचे हरि सुतार आदि उपस्थित होते
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सातोली येथील जि,प,शाळेत सध्या दोन शिक्षक आहेत.

संच मान्यता पटानुसार ६१,ते९० पटसंख्या असल्यानंतर तिसरा शिक्षक देणे अनिवार्य आहे पंरूतु या शाळेत दोन शिक्षक आहेत या शाळेची पटसंख्या ६७असून या शाळेत इ,१ते५वर्ग आहेत या वर्गासाठी दोन शिक्षक आहेत.

हेही वाचा – विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार नोंदणी

मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ‘ हे’ असतील नवीन थांबे, कधीपासून होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर

त्यामुळे विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे व येथील शिक्षकावर ही भार पडत आहे. त्याना वेळ मिळत नाही तरी लवकरात, लवकर या जि,प,शाळेला एक शिक्षक द्यावा असी मागणी पालक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती यांच्या कडून होत आहे.

karmalamadhanews24: