*राज्यघटना ही देशाला दिलेली अमूल्य देणगी*
केत्तूर ( अभय माने) भारतीय राज्यघटना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली अमूल्य देणगी असून, राज्यघटनेमुळे माणसाला माणसाची किंमत मिळाली. माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली. असे प्रतिपादन नेताजी सुभाष महाविद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
6 सहा डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा – दिपक ओहोळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
क्षितिज महिला ग्रुप कडून श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
यावेळी बोलताना किशोर जाधवर म्हणाले की,जोपर्यंत चंद्र – सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहतील. त्याच विचारावर सध्या देश चालू आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवायची असेल तर बाबासाहेबांचे विचार समजून घेऊन आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.
यावेळी प्रास्ताविक रामचंद्र मदने यांनी केले तर आभार पर्यवेक्षक भीमराव बुरुटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.