राजुरी येथील श्री. राजेश्वर विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार
केतूर ( अभय माने) गुरुवार दि.३१/०८/२०२३ आज रोजी श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी प्रशालेतील १४ वर्ष वयोगटातील संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याने व १७ वर्षे वयोगटातील संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी, ग्रामस्थ व राजुरी ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक मारुती साखरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल व भविष्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हेतूने राजुरी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा फेटा, नारळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मिठाई वाटली त्याबरोबर सर्व खेळाडूंची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – करमाळा भाजपाच्या वतीने देवळाली येथे मन की बात कार्यक्रम व टिफिन बैठक संपन्न
करमाळा येथे तपश्री च्या पुढाकाराने नेत्र शिबिर संपन्न; आजवर 4500 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक झोळ सर, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, राजुरी गावचे माजी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, नवनाथ दुरंदे, दादा बापू साखरे, श्रीकांत साखरे, नवनाथ साखरे, रेवणनाथ बाप्पू साखरे, राजेंद्र भोसले,दीपक साखरे, धनंजय साखरे, रत्नाकर तळेकर, विजय गरड, जगन्नाथ सर,.अमोल कोल्हे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Add Comment