पुणे पुस्तक महोत्सवात जगदीशब्द फाउंडेशनच्या ग्रंथ दालनास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष भेट

पुणे पुस्तक महोत्सवात जगदीशब्द फाउंडेशनच्या ग्रंथ दालनास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष भेट

पुणे(प्रतिनिधी); महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक जगदीश भाऊ यांनी लिहिलेल्या व नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाची महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. तसेच त्याची विक्रमी विक्री ही सुरू आहे.

या पुस्तकाबद्दल अनेक मान्यवर आपली मते व्यक्त करत आहेत. पुणे येथे सुरू असलेले ऐतिहासिक ‘पुणे पुस्तक महोत्सव’ यामध्ये देखील ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक विशेष चर्चेत आहे. अनेकांचे लक्ष या पुस्तकाकडे आहे.

तर आज प्रदर्शनास भेट देण्यास आलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी जगदीशब्द फाउंडेशनच्या स्टॉलला भेट देऊन ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक हाती घेत, या पुस्तकाबद्दल व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांचे विशेष अभिनंदन केले. हे पुस्तक नक्कीच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादाही आहे. असे मत यावेळी प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

तसेच लेखक जगदीश ओहोळ यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. अगदी कमी कमी वयात आपण हा अनमोल असा ग्रंथ नव्या पिढीच्या हाती देत आहात व बाबासाहेबांबद्दल यापुढेही आपण असेच संशोधनात्मक लेखन करावे व नव्या पिढीला महापुरुष सांगावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासह पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, रिपाइंचे मंदार जोशी, दीपक ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – उजनीत सोडले एक कोटी मत्सबीज; मत्स्य उत्पादन वाढण्याची आशा!

कुऱ्हाडीने काकाचं मुंडकं तोडलं अन् बाईकवर घेऊन पुतण्या गावात फिरला, जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने माढ्यात खळबळ!

पुणे पुस्तक महोत्सवात ‘जग बदलणारा बापमाणूस’ ची विशेष चर्चा-

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असणाऱ्या व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवात’ जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाची विशेष चर्चा होत आहे. त्यांच्या 108 या स्टॉलला भेट देण्यासाठी अनेक मान्यवरांची मांदीआळी येत आहे, तर वाचकांमधूनही या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लेखक जगदीश मोहोळ यांना भेटण्यासाठी अनेक वाचक विशेष उपस्थिती दर्शवत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line