मकाईने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल 25 डिसेंबर पर्यंत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार शेतकरी सभासदांचा मोर्चा

मकाईने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल 25 डिसेंबर पर्यंत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार शेतकरी सभासदांचा मोर्चा

करमाळा (प्रतिनिधी); मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 25 डिसेंबरपर्यंत कसल्याही परिस्थितीत देणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्फत मकाई चेअरमन कार्यकारी संचालक यांनी सांगितले आहे.

जर 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न केल्यास सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. उमरड येथील ग्रांमपंचायत कार्यालय येथे मकाई कारखाना शेतकरी सभासदांची बैठक पार पडली.

या बैठकिला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने,दिलीप मुळे महाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे उमरड येथील मकाई कारखाना ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की आपण करमाळा तहसील कार्यालयावर 8 डिसेंबर रोजी थु थु आंदोलन केले.

यावेळी बेमुदत आंदोलन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आमचा आग्रह होता पंरतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मकाई कारखान्यांनी 25 डिसेंबर पर्यंत आम्ही कसलेही परिस्थितीत बिल देणार असल्याचे सांगितल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन स्थगित केले.

आम्हाला वाटले की 25 डिसेंबर च्या अगोदर शेतकरी सभासदाच्या खात्यावर बिल जमा होईल परंतु 25 डिसेंबरला फक्त एक आठवडा अवधी राहिला असून अद्यापही मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन संचालक कार्यकारी संचालक यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत. एकंदर परिस्थिती बघता ‌ मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद पैसे कसे देणार हा एक प्रश्न आहे.

त्यांनी जर 25 डिसेंबरच्या आधी बिल दिले तर आम्ही सर्व शेतकरी बांधवासह त्यांचा सत्कार करू बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी त्यांच्या तत्कालीन चेअरमन काळामध्ये ही बिले थकीत ठेवली आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.

एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी सावकाराचे बँकेचे कर्ज प्रपंचाची ओढाताण दुष्काळा चा फटका सर्वसामान्य शेतकरी सभासदाला बसला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बिल न दिल्यास याचा मोठा उद्रेक होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

जेऊर येथील ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे माजी आमदार पाटील यांनी केली मागणी

त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 25 डिसेंबर पर्यंत कसल्याही परिस्थितीत मकाई सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदाला थकीत ऊस बिल देण्यासाठी सुचित करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढून कारखान्याचे मालमता जप्त करून शेतकऱ्यांना ऊस बिल तात्काळ मिळवुन देऊन सहकार्य करण्याची मागणी प्रा. रामदास झोळसर सर यांनी केली आहे.

karmalamadhanews24: