प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाढीसाठी उंदरगावात रास्ता रोको आंदोलन
माढा प्रतिनिधी – मागील काही काळामध्ये गायीच्या दुधाला प्रती लिटर 38 रुपये इतका भाव मिळत होता. परंतु सरकार आणि दूध संघचालकाच्या मनमानी कारभारामुळे व चुकीच्या धोरणामुळे सद्या दुधाला 25 रुपये भाव मिळत आहे. दुष्काळामुळे गायीच्या चाऱ्याचा आणि पशुखाद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे.
त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आला आहे. त्यामुळे गायीच्या दुधाला 50 रुपये व म्हशीच्या दुधाला 70 रुपये भाव द्यावा अथवा प्रती लिटर 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी केली आहे.
त्या प्रसंगी प्रवीण लोकरे विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष, तालुका संघटक संभाजी उबाळे ,किरण लवटे, विजय माने, युवराज तांबीले, पवण माने, प्रशांत माने, दत्तात्रय लोकरे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.