पोपळज शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पोपळज शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

केत्तूर, (अभय माने ) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची पोफळज शाळा – प्रा. गणेश भाऊ करे-पाटील.पोफळज शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. यश कल्याणी संस्थेकडून अकरा हजार रूपयांचे पारितोषीक जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून करे- पाटील बोलत होते. सुरुवातीस पोफळजचे सरपंच कल्याण पवार, उपसरपंच राणी बिभीषण गव्हाणे, शाळा व्य. समितीचे अध्यक्ष राहुल धुमाळ यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.
यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.गणेश करे पाटील म्हणाले की, पोफळजशाळेचे विद्यार्थी गुणवत्ताधारक असून विविध स्पर्धांमधून सहभागी होत नेत्रदिपक यश मिळवत आहेत. तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा वसंत महोत्सवातील विविध स्पर्धेत या वि‌द्यार्थ्यांनी घेतलेल्या उल्लेखनिय व उत्स्फुर्त सहभागाबद्दल करे-पाटील यांनी पोफळज शाळेचे व शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थी कलाकारांना यश कल्याणी संस्थेकडून सहभाग प्रमाणपत्र व शाळेसाठी रोख अकरा हजार रु.चे पारितोषिक जाहीर केले.


यावेळी व्यासपीठावर सरपंच कल्याण बापू पवार,बिभीषण
गव्हाणे मारूती आप्पा पवार, दत्तात्रय पवार पाटील , तसेच प्रमुख पाहुणे प्रा.करे पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सादिक पठाण साहेब, सामाजिक कार्यकर्ते अक्षय कुलकर्णी, शा. व्य. स. अध्यक्ष राहूल धुमाळ, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. लावंड करमाळा तालुका इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष पक्षीमित्र प्रा. कल्याणराव साळुंके , अरूण काका पवार, करमाळा तालुका सोसायटीचे संचालक सतिश चिंदे सर , श्रीकृष्ण भिसे, अनिल कुलकर्णी सर उपस्थित होते .


या कार्यक्र‌मात कलाकार विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गीतांसह शेतकरी गीत, कोळीगीत, लावणी, गवळण, आदिवासी गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. तसेच शिवजयंती उत्सव समिती तर्फे 13 हजार रू. किंमतीची साऊंड सिस्टीम शाळेस भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी पोफळज व परिसरातील ग्रामस्थ, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

हेही वाचा – नेताजी सुभाष विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक जहांगीर सय्यद, निलेश जाधवर , पांडुरंग गुटाळ पूजा वाघमारे (लोंढे ) , शुभांगी शिंदे (बोराटे ), मॅडम, मुमताज पठाण मॅडम, रेखा शिंदे (साळुंके ) मॅडम, यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक अंकुश अमृ‌ळे यांनी उपस्थित मान्यवर, शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजमल पाखरे व विवेक पाथ्रुडकर यांनी केले.

karmalamadhanews24: