मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही; दिवेगव्हाण येथे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार!

मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही; दिवेगव्हाण येथे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार!

केत्तूर (अभय माने) मराठी बांधवांनो अशीच एकजूट कायम ठेवा मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे दिवेगव्हाण येथे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आपले प्रमुख ध्येय मराठा आरक्षण आहे त्याबद्दलची घोषणा आचारसंहिते पूर्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथे शनिवार (ता.23) रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे चार वाजता आयोजन करण्यात आले होते परंतु, इतर कार्यक्रमामुळे जरांगे पाटील हे साडेपाच वाजता दिवेगव्हाण येथे आले.आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले.

तुमचा शब्द खाली जाऊ नये व परिसरात अपमान होऊ नये म्हणून येथे येणे गरजेचे होते त्यामुळे मी येथे आलो तर आंतरवाली सराटी येथे उद्या रविवार (ता.24) रोजी महत्वाची बैठक असल्याचे सांगून ते आंतरवालीकडे रवाना झाले.

सुरुवातीला फटाक्यांच्या आतषबाजीत मराठा समाज बांधवांनी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले मनोज जारंगे पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना दिली.

आंतरवाली सराटी येथे प्रयाण करण्यापूर्वी दिवेगव्हाण ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून एक कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जीसीपीतून फुलाची पुष्पवृष्टी करण्यात आली.

सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने तरुणांच्या भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रामदास झोळ उपस्थित होते.यावेळी आलेल्या मराठा बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी एक मराठा एक कोटी मराठा, जय जिजाऊ जय शिवराय ,मराठा आरक्षण आमच्या हक्काचे अशा गोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

karmalamadhanews24: