पोफळजच्या हळदी-कुंकू समारंभात माता पालकांसह जेष्ठ व विधवा महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग .
मनोरंजनात्मक स्पर्धा : विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान
केत्तूर (अभय माने) मकर संक्रांतीचे औचित्य साधून पोफळज ( (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हळदी – कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या स्नेहल पवार यांनी केले.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका मुमताज पठाण यांनी केले. शिक्षीका शुभांगी बोराटे यांनी
यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ ही प्रतिज्ञा घेतली.शिक्षिका रेखा शिंदे यांनी उपस्थित माता पालकांचे मनोरंजनात्मक खेळ घेतले यामध्ये रींग उडी,तीन पायाची शर्यत, संगीत खुर्ची , उखाणे ‘आदि.मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या .
हेही वाचा – परांडा येथे झालेल्या एसटी अपघातात पारेवाडी येथील तात्या पाटणे यांचा मृत्यू
पोथरे शाळेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दिमाखात संपन्न
विजेत्या स्पर्धक रुपाली धुमाळ,शितल पवार,सोनाली धुमाळ रेश्मा हजारे यांचा’ गृहोपयोगी वस्तू भेट देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ व विधवा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.उपस्थित सर्व महिलांना प्रत्येकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.शिक्षिका रेखा शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
या समारंभाचे निमित्ताने महिलांमध्ये स्नेह व परस्पर आदर दिसून आला. सर्वांनी आपली शाळा जिल्हा परिषद शाळा हा नारा दिला व शाळेसाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
” खेळामध्ये रमलेल्या महिलांनी हारजीत पेक्षाही आनंद मिळतो यात समाधान मानले. महिलांना विरंगुळा मिळावा आणि ज्ञानात भर पडावी या दोन्ही हेतूने हळदी – कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
– रेखा शिंदे साळुंखे,शिक्षिका,पोफळज