पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात, महाराष्ट्र शासनाने तात्काळ अर्थिक मदत करावी: उत्तरेश्वर कांबळे

पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात, महाराष्ट्र शासनाने तात्काळ अर्थिक मदत करावी: उत्तरेश्वर कांबळे

जेऊर (प्रतिनिधी); जुलै महिना निम्मा उलटून गेला तरी राज्यातील बहुतांश भागात अद्याप ही समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा पुरता संकटात सापडला असुन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना प्रति एकरी 25 हजार रूपये अर्थिक मदत करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.

अधिक बोलताना कांबळे म्हणाले की राज्यात सर्व पक्षांचे सरकार असुन खमक्या विरोधी पक्षनेता राहिलेला नाही एकही नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही.

राज्यात मागच्या वेळेस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता त्यावेळेस देखील महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना अर्थिक मदत करून कर्जमाफी द्यायला पाहिजे होती परंतू महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

हेही वाचा – बोअर मध्ये अडकलेली मोटर काढताना नेरले येथील शेतकरी भिमराव गोडसे यांचा मृत्यू

धक्कादायक! कोयता-कुऱ्हाडीने वार करत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या

यावेळीची परिस्थिती तर कोरड्या दुष्काळाची जाणवत आहे राज्यातील काही भागात पाण्याचे टॅकर सुरू आहेत शेतकरी जनावरांसाठी चारा छावणीची मागणी करत आहेत.

शेतकरी जगला तरच राज्यातील जनता जगेन त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना त्वरित अर्थिक मदत करणे गरजेचे आहे असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.

karmalamadhanews24: