करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

पाऊस नसल्याने उभी पिके लागली जळू;चिंतातूर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाऊस नसल्याने उभी पिके लागली जळू;चिंतातूर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

करमाळा प्रतिनिधी: पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी आजपर्यंत मनाला तसा पाऊस झाला कुणी. जुन महिना कोरडा गेला जुलैमध्ये जेमतेम पाऊस झाला पुढे पाऊस होईल ह्या आशेवर शेतकऱ्यांनी कशीतरी पेरणी होती. जवळ आसलेले थोडेफार पैश्यातून बि- बियाणे खते पेरणी यासाठी खर्च केले. परंतु परत ऑगस्ट महिन्यात पावसाने करमाळा तालुक्याकडे पाठ फिरवली त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.अहोरात्र कष्ट करुन आता शेतकऱ्याच्या हाती फक्त निराशा आली आहे.

जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चारा यासाठी शेतकऱ्यांना पैसे देऊन विकत घ्यावा लागत आहे. कडबा ४०००ते ५०००शेकडा हिरवा चारा ३०००ते ३५००टन या भावाने खरेदी करताना शेतकरी दिसत आहेत एवढ्या महागाईचा चारा घेऊन जनावरे सांभाळणे शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात अडचणी येत आहेत. तरी याकडे मात्र सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा – अरे बापरे ! चमत्कार.!करमाळा एमआयडीसीतील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर उगवली झाडे

खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे जेऊर, माढा, केम येथे रेल्वे गाड्यांना थांबा; गणेश चिवटे

एकीकडे शासन शेतकरी जगला तरच आपण जगु असे आश्वासन देत आणि दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना डोकावुन सुध्दा पहायला तयार नाही.ज्या लोकांनी पिक भरला आहे त्या पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत करावी. जनावरांना चारा पाणी उपलब्ध करुन द्यावे तसेच दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी सरकारकडे शेतकरी करत आहेत.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!