पाटील गटाला धक्का, करमाळा तालुक्यातील ‘या’ गावच्या विद्यमान सरपंचासह उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रहार मध्ये प्रवेश

पाटील गटाला धक्का, करमाळा तालुक्यातील ‘या’ गावच्या विद्यमान सरपंचासह उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रहार मध्ये प्रवेश

केम(प्रतिनिधी संजय जाधव); करमाळा तालुक्यातील मलवडी गावच्या सरपंच बायडाबाई सातव उपसरपंच साहेबराव दुर्गुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर पॅनल प्रमुख गणेश कोंडलकर सर्वांनी काल प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी गेल्या सहा सात वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व टीमच्या सेवेचं हे फळ आहे असं, बरोबर करमाळा तालुक्यातील विद्यमान आमदार तसेच विरोधी सर्वच नेते यांनी ज्या प्रकारे तालुक्यातील जनतेची फरपट सुरू केली आहे उसाच्या एफ आर पी चा मोठा प्रश्न आ करून बसला आहे कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे.

मलवडी गावचा विजेचा प्रश्न प्रलंबित , दहिगाव उपसा सिंचन योजना याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. मलवडी गावातील वेस, स्मशानभूमी, व्यायाम शाळा, आरोग्यासाठी हॉस्पिटल, गावाला जोडणारे रस्ते पाणी विविध मूलभूत गरजाचे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्याचे शब्द दिला आहे.

आनेक कर्मचारी आत्महत्या करत आहेत पाणी वाटपात सुद्धा करमाळा तालुक्यातील अनेक गावात दुजाभाव केला जात आहे हे सर्व नेत्यांचे अपयश पाहता करमाळा तालुक्यातील अजून तीन-चार ग्रामपंचायती प्रहारच्या संपर्कात असून पुढील पंधरा दिवसात त्यांचाही समावेश प्रहार जनशक्ती पक्षात होणार आहे,असे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील जिल्हाउपाध्यक्ष रमेश पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, संपर्कप्रमुख जमीर भाई शेख कार्याध्यक्ष खालील भाई मणियार,तालुकाध्यक्ष संदीप तळेकर,तालुका संघटक नामदेव पालवे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव या मान्यवर उपस्थित मलवडी गावचे लताबाई नागनाथ कोंडलकर ग्रामपंचायत सदस्य पप्पू वामन कोळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा प्रमोद कोंडलकर माजी सरपंच गणेश कोंडलकर कार्याध्यक्ष सोलापूर युवा आघाडी जिल्हा पदी निवड नाना शिंदे, सतीश जाधव, बाबासाहेब कोळी ,बापूराव पालवे ,रवी कोळी, शंकर को, विजय शिंदे ,नामदेव माळी, शिवाजी जाधव, अमोल जाधव, दादा पालवे ,सतीश कोंडलकर ,विशाल कोंडलकर, रमेश कोंडलकर, रामेश्वर कुंडलकर, नागेश कोळी, किसन कोळी, विशाल जाधव, गणेश जाधव, बाळू जाधव,असे अनेक शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार मध्ये सामील


सध्या करमाळा तालुक्यात विद्यमान आमदार तसेच सर्व विरोधी गटातील नेते मंडळी सोडायच्या राजकारणात व्यस्त असून जनतेच्या प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे आणि मलवडी ग्रामपंचायत प्रहार मध्ये प्रवेश करण्यामागे याच नेते मंडळीचे अपयश दडले आहे भविष्य वंदनीय बच्चुभाऊंच्या माध्यमातून विकासाचे राजकारण करमाळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल तसेच येत्या पंधरा दिवसाच्या अजून तीन ग्रामपंचायती प्रहार मध्ये दाखल झालेले चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळेल.
– दत्ताभाऊ मस्के पाटील ( जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष )

हेही वाचा – केळी पट्ट्यातील ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरूच; मा.आ.पाटील यांची करमाळा

ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम – चेअरमन अशोक लुणावत नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर

मलवडी गावचा विकास पूर्णपणे थांबलेला असून तालुक्यातील एकही नेता मतं मागण्याच्या पलीकडे आमच्या गावात येत नाही गावातील तरुण पिढी दारूमुळे बरबाद व्हायला लागली आहे दारूच्या भट्ट्या गावात राजरसपणे सुरू आहेत लोकांचे अनेक प्रश्न आ वासून बसले आहेत आणि यासाठी गावच्या विकासासाठी आम्ही प्रहारला साथ घातली आहे.
– बायडाबाई सातव ( सरपंच मलवडी गाव )

karmalamadhanews24: