श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे आगळा वेगळा नऊ दिवस स्त्री जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम संपन्न
केम- श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी विचार -जागर नवदुर्गांचा स्त्री जाणीवांचा हा स्त्री कर्तत्वाचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ज्युनिअर कॉलेजमध्ये थोडासा आगळा वेगळा असा हा नवोपक्रम राबविण्यात आला.
जागर नवदुर्गांचा स्त्री जाणीवांचा या विशेष कार्यक्रमात दररोज एक असे नवरात्रातील एकूण नऊ दिवस भारतीय स्वातंत्र्यपूर्व कालखंड व स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्त्रियांचे असणारे महत्त्वपूर्ण योगदान व त्यांचे ऐतिहासिक कार्य यांचा आढावा घेण्यात आला. या नवोपक्रमामुळे या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनींना या कार्यकर्तृत्ववान नवदुर्गांच्या ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक कार्यांची ओळख झाली.
जे.के फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग
या कार्यक्रमांमध्ये कु.सानिया पठाण या विद्यार्थिनीने संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, कु. ईश्वरी तळेकर हिने राजमाता जिजाऊ मासाहेब, कु.दिशा तळेकर हिने सावित्रीबाई फुले, कु.चंदना तळेकर हिने अहिल्याबाई होळकर, कु.धनश्री पंडित हिने किरण बेदी, कु. शीतल कुरडे हिने रमाबाई आंबेडकर, कु. विद्या कांबळे हिने फातिमाबी शेख, कु. राजनंदीनी जगताप हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, कु. सायली बिचितकर या विद्यार्थिनीने सिंधुताई सपकाळ या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्यांचा, त्यांच्या विचारांचा आढावा घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांचे सहकार्य लाभले.