नेताजी सुभाष विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

नेताजी सुभाष विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

केत्तूर ( अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर २ (ता. करमाळा) येथे एस.एस.सी 1996 च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व शिक्षकवृंद कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.या स्नेहमेळाव्यासाठी त्यावेळचे माजी शिक्षक लक्ष्मण टाळके,सदाशिव यादव,दत्तात्रय काकडे,कळसाईत मॅडम,उपस्थित होते.सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांचा सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला.या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अनेकांनी संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शाळेला मदत म्हणून सहा वर्गखोल्यांवरचे खराब झालेले सर्व पञे बदलण्यासाठी साधारणतः चार लाख रूपये खर्च करण्याचे ठरवले.प्राचार्य दिलावर मुलाणी सरांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे धन्यवाद दिले.सदर बॅच ही विद्यालयाची सर्वांत यशस्वी बॅच म्हणून ओळखली जाते.

हेही वाचा – शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन वर्ष पाचवे केम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

या मेळाव्याला माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने हजर होते.ब-याच विद्यार्थी,विद्यार्थिनींनी शाळेविषयी आपली भावना मनोगतातून व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुञसंचलन किशोर जाधवर यांनी केले.आभार रामचंद्र मदने यांनी मानले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line