नेताजी सुभाष विद्यालयात महिलांचा महामेळावा;संक्रातीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम

नेताजी सुभाष विद्यालयात महिलांचा महामेळावा* संक्रातीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम

केतूर (अभय माने) एकोपा वाढावा,संघटन वाढावे त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नेताजी सुभाष विद्यालय व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या पालकामाता बरोबरच ग्रामस्थ महिलांचा संक्रातीनिमित्त प्रशालेमध्ये हळदीकुंकू तसेच तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

गुरुवार (ता.18) रोजी झालेल्या या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महिलांची हळदी कुंकू याबरोबरच तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी शाळा परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता.

कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कमल पवार, शुभांगी विध्ने, कीर्ती पानसरे, उर्मिला माने, संगीता कटारिया, सुषमा कोकणे, प्रियंका श्रीरामे, संचिता खोडवे, रेश्मा जाधवर, स्वाती तनपुरे, मंगल बाटिया,जोशी,काजल कनिचे, खुशी कडवे, रूपाली महामुनी यांचेसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा – आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

प्रशालेच्यावतीने प्रास्ताविक लता भोसले यांनी केले तर आलेल्या महिलांचे आभार माधुरी वळववी यांनी मांनले.प्रियंका साळी,अश्विनी पवार,मंगल चौधरी यांचे सहकार्य लाभले.

छायाचित्र -कत्तूर : हळदी कुंकू कार्यक्रमासाठी जमलेल्या महिला

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line