आम्ही साहित्यिक करमाळा पुणे महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

(प्रतिनिधी); विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 24 जानेवारी 1937 रोजी करमाळा शहरात आले होते व करमाळा शहरात त्यांची मोठी जाहीर सभा झाली होती. आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते. असा संदर्भ लेखक जगदीश ओहोळ यांच्या जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकातून पुढे आलेला आहे. खरंतर बाबासाहेब आंबेडकर यां सारखे महान व्यक्तिमत्व करमाळा शहरात आले होते ही संबंध करमाळाकरांसाठी अभिमानाची व ऐतिहासिक घटना आहे. आणि त्याच ऐतिहासिक घटनेच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात 24 जानेवारी या दिवशी विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करून हा इतिहास जपण्याचा प्रयत्न करू असे मंगेश चिवटे यांनी पुणे येथे सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये बोलताना जाहीर केले.

सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशन माजी आयपीएस डॉ.सुरेश खोपडे, प्रा. नितीन तळपाडे, कामगार नेते महादेव वाघमारे व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले.

यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, करमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून मोठा संघर्ष करून आलेला एक तरुण जगदीश ओहोळ हे आपल्या अभ्यासाच्या जोरावर वक्तृत्व आणि लेखनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि देशभर आपला नावलौकिक मिळवत आहेत आणि तालुक्याचे नाव उंचावत आहेत. त्यांच्या पुस्तकाची चर्चा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातही होते आणि कोलंबिया विद्यापीठात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे प्रकाशन झाले ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच पुस्तकात करमाळ्यात बाबासाहेब आंबेडकर आले हा संदर्भ माझ्या वाचनात आला आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटला. हा इतिहास आपण जपला पाहिजे. यासाठी या दिनी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करू असे चिवटे म्हणाले.

यावेळी जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींचा ‘क्रांतीसुर्य, क्रांतीज्योती व बापमाणूस’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात करमाळा तालुक्यातील साहित्यिक व आदर्श शिक्षिका अनुराधा शिंदे-कांबळे, पत्रकार शितलकुमार मोटे, आदर्श शिक्षक दीपक ओहोळ आदींचा ही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुरस्कारांर्थीची निवड करण्यात आली होती.

या कार्यक्रमात बोलताना करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. नितीन तळपाडे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी, लेखक म्हणून इतका मोठा नावलौकिक मिळवतो व एक प्रकारे गुरुच्याही पुढे जेव्हा एक पाऊल टाकतो, तेव्हा आमचा विद्यार्थी म्हणून त्याचा आम्हास अभिमान वाटतो, आम्ही असे विद्यार्थी निर्माण केले याचं समाधान आहे. आज त्यांच्या पुस्तकाची कीर्ती जगभर गाजत आहे व ते पाहिल्यानंतर त्यांचे शिक्षक म्हणून आम्हाला आनंद वाटतो असे मत यावेळी प्रा. तळपाडे सर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – करमाळा बाजार समितीच्या संचालिकापदी मनीषा देवकर यांची निवड

140 कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याची वाशिंबे चौफूला दरम्यान 4 किमी साईड पट्टी उकरली

व्हायरल कचरावेचक तरुणीचा विशेष पुरस्काराने सन्मान ; तर मंगेश चिवटें कडून आर्थिक मदत

पुणे पुस्तक महोत्सवात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक स्टॉल वर बापमाणूस पुस्तक पाहताना फोटो व्हायरल झालेली कचरावेचक तरुणी प्रिती मोहिते चा या कार्यक्रमात ‘बापमाणूस विशेष वाचक’ पुरस्कारासह रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तर या तरुणीस आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचे कडून स्टेजवरच पाच हजार रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!