मानेगाव येथे नीट परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल संस्कृती मोटे व दिपक गावडे यांचा सत्कार
माढा / प्रतिनिधी -(राजेंद्र गुंड)
– माढा तालुक्यातील मानेगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील संस्कृती हरिश्चंद्र मोटे व दिपक बापू गावडे यांनी सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय पात्रता परीक्षा अर्थात नीटच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादित केल्याबद्दल दोघांचाही मानेगाव ग्रामपंचायत, संजीवनी विद्यालय,ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्कृती मोटे हिने 720 पैकी 678 गुण तर दिपक गावडे या विद्यार्थ्यांने 720 पैकी 660 गुण प्राप्त केले आहेत.या दोघांनीही प्रामाणिक कष्ट,जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे दैदिप्यमान यश संपादित केल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच तानाजी लांडगे व त्यांच्या पत्नी उमा लांडगे यांच्या हस्ते व उपसरपंच सिद्धेश्वर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी माजी उपसभापती उल्हास राऊत,माजी सरपंच महेबुब शेख,तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ पारडे,शिवाजी भोगे,हरिश्चंद्र मोटे, दिपक देशमुख,हरिष कारंडे,पिंटू नागटिळक,राजाभाऊ भोगे,धनाजी सुतार,सिराज शेख,बबन शेळके, रसुल शेख,बापू शेळके,शीतल जोकार,बळीराम शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संजीवनी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्कृती मोटे व दिपक गावडे यांचा सत्कार मुख्याध्यापक सुनील चौगुले व संस्थेचे सचिव प्राचार्य सुभाष नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सहशिक्षक गजानन जोकार,मारुती शिंदे,विकास मोहोळे, गोविंद पारडे,वर्षा शिंदे,सुनील गोसावी,प्रवीण क्षीरसागर,सचिव प्रकाश जाधव,श्रीहरी आतकरे उपस्थित होते.
आनंदनगर -मानेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने संस्कृती मोटे व दिपक गावडे यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पारडे व चेअरमन विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हनुमंत चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब पारडे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी मोटे,सामाजिक कार्यकर्ते बिरुदेव शेळके,औदुंबर मोटे,गणेश पारडे,तानाजी शेळके,बंडू माने,दिपक कांबळे,दिपक देशमुख,आलम जमादार यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
फोटो ओळी – मानेगाव ता.माढा येथे नीट परीक्षेतील यशाबद्दल संस्कृती मोटे हिचा सत्कार करताना सरपंच तानाजी लांडगे,उमा लांडगे व इतर मान्यवर.