माढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचांनी दिला पदाचा राजीनामा; मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय
माढा प्रतिनिधी –
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षण मिळावे अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली.अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला.काही ठिकाणी ग्रामपंचायतमधील सदस्य व सरपंच देखील राजीनामा दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
माढा तालुक्यातील भोसरे गावातील सुमन रामदास बागल यांनी देखील आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.सध्या राज्यात सुरू असलेले मराठा आंदोलन व उपोषण शांततापूर्ण लोकशाही मार्गाने होण्यासाठी मी एक मराठा व समाजाचा घटक म्हणून या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत आहे.
सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कुर्डूवाडी येथील कुस्तीसम्राट असलम काझी यांची निवड
आरक्षणासाठी मी भोसरे ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे.