एलएलएम परीक्षेत करमाळ्याचे ॲड.आमिर वहाब खान पुणे विद्यापीठात प्रथम
करमाळा(प्रतिनिधी) – एल.एल.एम. या पदव्युत्तर परीक्षेत करमाळा शहरातील ॲड. आमिर अब्दुल वहाब खान यांनी ८६.८८ गुण मिळवत पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
ॲड. आमिर हे एसटी महामंडळाच्या करमाळा आगारातील निवृत्त वाहतूक निरीक्षक अब्दुल वहाब जहूरअली खान
यांचे सुपुत्र आणि पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक नासीर खान तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील लिपिक आशिर खान यांचे लहान बंधू आहेत. एल एल एम पदवी आंतरराष्ट्रीय कायदा, कॉर्पोरेट कायदा, कामगार कायदा, मानवी हक्कांसह इतर देशांच्या कायदेविषयक सेवांसाठी उपयुक्त ठरते.
‘कायद्याचे डॉक्टर’ समजल्या जाणाऱ्या या पदवीत अतिशय कष्ट घेत पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल ॲड. आमिर खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.