…….. किर्तेश्वराचा कळस …….      —————————        ( माझ्या माहेरवाशिणींचा उत्स्फूर्त सहभाग )                             *********

…….. किर्तेश्वराचा कळस …….

                    —————————

       ( माझ्या माहेरवाशिणींचा उत्स्फूर्त सहभाग )

                            *********

       आज पवित्र श्रावणा मधला चौथा सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार व्रताची सांगता अन आपल्या संस्कृतीला या काही परंपरेचं आवडीने उत्साहात पालन करण्याचं तसेच उत्साहात साजरा करण्याचं खरंतर शारीरिक आणि मानसिक बळ खरं म्हणजे तीच शक्ती देत असते.

     पवित्र अशा भीमेच्या तटी भगवान शिवाने श्री किर्तेश्वर रूपात अवतार धारण केला ते पवित्र असं तीर्थक्षेत्र नंतर भोवती बाळ गोपाळ… भक्तगण सुखात नांदू लागली धरणी माय हिरवं सोनं देऊ लागली बांधा बांधावर सुबत्ता नांदू लागली आणि अशा या पवित्र नगरीला केतुर म्हणून संबोधू लागले खरंतर भगवान शिवाच्या सानिध्यात त्याच्या कृपा छत्रात नांदत असलेला गाव अन भवतालची पंचक्रोशी खरंच ती भूमी आणि ती माणसं पण भाग्यवान खरंतर किर्तेश्वराची शिवस्तुती करताना या धार्मिक पर्वामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय असा 1996 सालचा 13 कोटी ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप आणि भगवान शिव श्री किर्तेश्वरांचा कलशारोहण समारंभ म्हणजे सर्व सुवर्ण अक्षराने लिहून ठेवाव्यात अशा आठवणी आणि खरंतर पहिलं आभार मानलं पाहिजे वयोवृद्ध आणि तरुण पिढीचं कारण वयोवृद्ध मंडळी हे म्हणजे विचार निर्मिती आणि संकल्पना…आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमची तरुण पिढी करत असते आणि खरंच भगवंताची आपण सर्वांनी मिळून केलेली सेवा…भक्ती एक टीमवर्क म्हणावं लागेल

     अन दुसरं आभार मानावं लागल माझ्या केतुरच्या माहेरवाशिन भगिनींचं कारण त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्या कार्यात असणारा बहुमोलाचा वाटा यातूनच हा कलशारोहणाचा संकल्प सिद्धीस जातोय आपण आता श्री किर्तेश्वर मंदिराविषयी थोडसं पाहू श्री किर्तेश्वर मंदिर हे हेमाडपंती मंदिर म्हणजे अलभ्य योग हे मंदिर म्हणजे 13-14 व्या शतकात देवगिरीकर यादव राजे कृष्णदेवराय… महादेवराय… व रामचंद्र देव यांच्या दरबारातील मंत्री हेमाद्री पंडित उर्फ हेमाडपंत याने काळे दगड एकावर एक रचून विशिष्ट प्रकारचे मंदिर घडविण्यास सुरुवात केली त्यामुळे आजही यादवकाळात बांधलेल्या अशा मंदिरांना हेमाडपंती बांधणीची मंदिरे म्हणतात हेमाडपंती मंदिर हे हिंदू मंदिर आहे बहुतेक ठिकाणी हे मंदिर पांढऱ्या दगडात बांधलेले आहे व ते अत्यंत सुंदर असते मंदिरात अनेक शिल्पे असतात ज्या भगवान शिव व देवी पार्वती आणि इतर हिंदू देवतांचे प्रतिनिधित्व करतात असे मंदिर हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे आता विशेष म्हणजे मंदिर हे देवांचे निवासस्थान आणि ते एक उपासना गृह सुद्धा असते अनेक भक्त मंदिरात देवदर्शनासाठी येत असतात त्यांचे प्रबोधन तसेच माहितीपर मनोरंजन व्हावे म्हणून मंदिरावर शिल्पकला केलेली दिसून येते मंदिर एक सामाजिक संस्था म्हणून ही समजली जाते एक मंदिर आले म्हणजे त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग…व्यापार यांना चालना मिळते गावोगावचे लोक येत असल्यामुळे विचारांचे आदान प्रदान त्या ठिकाणी होते मंदिराच्या आजूबाजूंना मोठा बाजार विकसित झालेला दिसून येतो

     आता आपण पाहू मंदिरात असणारी घंटा देवाला जागे करण्याचे आणि आपण आलो आहोत असा संकेत देण्याचे साधन आपल्या मनात असलेल्या असंख्य विचारांचे कल्लोळ ते शांत होऊन एकाग्र चित्ताने देवाचे दर्शन घ्यावे यासाठी घंटेचे प्रयोजन दिसते घंटेखाली उभे राहून घंटा वाजवली की त्यातून होणारा नाद त्यामुळे मन शांत… स्थिर होण्यास मदत होते विचारांचा गलबला शांत होतो व आपण देवदर्शनावर आपले चित्त एकाग्र करू शकतो आता आज आपल्या श्री किर्तेश्वर मंदिराचा कलशारोहण समारंभ होत आहे तर घुमटावर कळस लावण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या लोकांना मंदिरात जाणे जमत नाही त्यांच्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे शिखर दर्शनं पापनाशम…असे म्हटले जाते कळसाचे दर्शन केल्याने मंदिरातील प्रतिमांचे दर्शन केल्याचे एकसारखेच पुण्य भेटते त्यांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपल्या आराध्याचे स्मरण केल्याने मंदिरात जाण्याचे पुण्य भेटते मंदिरामध्ये कासवाची प्रतिकृती असते त्याचं कारण आपल्या आराध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कासवाचे गुण जीवनात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

     कासव म्हणजे इंद्रिय निग्रह प्राणी कितीही प्रलोभने आली तरी इंद्रियावर व मनावर बुद्धीचा ताबा असला पाहिजे विष्णूच्या आशीर्वादाने कासवाला सत्वगुणांची प्राप्ती झालेली आहे कासवाला सत्व आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं कासवांच्या सहा अंगांना कासव स्वतःच्या इच्छेने आक्रसून घेते आणि कवचामध्ये शिरते त्याप्रमाणे भक्ताने सुद्धा काम…क्रोध…लोभ… मत्सर…आणि मोह यांना आक्रसून त्यांच्यावर विजय मिळवून मंदिरात दाखल व्हावे असा देखील विचार त्यामागे असण्याचे मानले जाते काही मंदिरातील कासव हे नतमस्तक स्वरूपात म्हणजे मान देवाच्या चरणाकडे झुकलेली तर काही मंदिरात जागृत कुंडलीनी अवस्थेत म्हणजे मान वर केलेली अशा स्वरूपात असते देवाच्या मूर्तीतून निघालेले सात्विक भाव हे कासव आपल्या मुखावाटे शोषून घेते पाय आणि शेपटीच्या मार्गाने वातावरण प्रसारित करते अशी श्रद्धा आहे यामुळेच गोमातेच्या खालोखाल कासवाला मान दिला जातो कोणतेही मंदिर हे जसे देवाच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी आहे तसेच डोळे भरून बघण्यासाठी सुद्धा आहे मंदिरात असलेली घंटा…दीपमाळ…वाहन मंडप…मंदिराचा उंबरठा…त्यावर असलेले राक्षसाची तोंड… ज्याला किर्तीमुख म्हणतात…गाभाऱ्याच्या द्वार शाखा… त्यांच्या डोक्यावर असलेल्या छोट्या कोनाड्यातील मूर्ती… ज्याला ललाटबिंब म्हणतात… अशा असंख्य गोष्टींमधून मंदिर आपल्याशी बोलत असते

     त्या सगळ्यांचे निरीक्षण करावं मंदिरात असलेल्या खांबांवर पुराणकथा…रामायण… महाभारतातल्या कथा शिल्पांकित केलेल्या असतात त्या पहाव्यात मंदिर हे जणू काही एक पुस्तक आहे असं समजून सर्व बाजूंनी वाचून काढावं अशा पद्धतीने मंदिर बघायला थोडासा वेळ लागेल पण काहीतरी सुंदर छान बघितल्याचं समाधान मिळेल खरंतर आपण देवाची भक्ती घरीसुद्धा करू शकतो पण आपण आवर्जून मंदिरात यासाठी जातो त्याचं पहिलं कारण शास्त्रात दिलयं तिथे जाऊन आपण आपला दैवी शक्तीवर विश्वास आहे हे सिद्ध होते दुसरे कारण की जो माणूस चांगल्या श्रद्धेने मंदिरात जातो त्याच्या सर्व समस्या दूर होतात मंदिरात मनात दृढ सत्ता व आशेची ऊर्जा निर्माण होते श्रद्धेच्या बळावरच धन समृद्धी…पुत्र…कन्या… ही रत्ने प्राप्त होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरात गेले पाहिजे जर काही चुकीचे केले असेल तर ते फक्त त्या माणसालाच माहीत असते प्रायश्चित्त म्हणून माफी मागण्यासाठी प्रार्थना करून मन हलकं करण्यासाठी मंदिरातील शंख…घंटा याच्या आवाजाने वातावरण व मन शुद्ध तसेच शांत होते धूप व दिवे लावल्याने मेंदूतील सर्व नकारात्मक भावना दूर जातात मंदिराची वास्तू पाहिल्यावर आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारते प्राचीन मंदिरे ही ऊर्जा व प्रार्थनेंची केंद्रे होती असे मानले जाते ******************************************

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

karmalamadhanews24: