श्री किर्तेश्वरांची आरती
…………………………
जय देव जय देव जय किरते श्वरा… जय देव जय देव जय किरतेश्वरा… हो देवा ईश्वरा l भक्त आणि भाविक देवा… भक्त आणि भाविक देवा करती जागरा… हो देवा ईश्वरा ll धृ ll किर्तेश्वर हे दैवत माझे… किर्तेश्वर हे दैवत माझे केतुर नगरीचे.. स्वामी केतुर नगरीचे l श्रावणमासी सोमवारी… श्रावणमासी सोमवारी भजन शक्तीचे…देवा शिव शक्तीचे ll१ll काया वाचा आत्मा आपला… काया वाचा आत्मा आपला ओवाळीला राया… देवा ओवाळीला राया l किरते श्वरा भक्त देवा… किरते श्वरा भक्त देवा.. लागती तुमच्या पाया… हो लागती तुमच्या पाया ll२ll ठाई ठाई तुमचा महिमा… ठाई ठाई तुमचा महिमा गाजतोया रोज…देवा गाजतोया रोज l सांज सकाळी… सांज सकाळी तुमचा डवर वाजं …देवा डवर वाजं ll३ll जाई जुई गुलाब मोगरा… जाई जुई गुलाब मोगरा फुलांच्या हारा… स्वामी फुलांच्या हारा l शोभुनी दिसती कीर्तेश्वरा..देवा कीर्तेश्वरा ll४ll ९५ साली…. ९६ साली देवाचा…महायाग झाला… हो महायाग झाला l करवीराचे शंकराचार्य… करवीराचे शंकराचार्य आले यागाला… हो आले यागाला l शिवलिंगावर १३ कोटीचा… शिवलिंगावर १३ कोटीचा नाम जपला…हो देवा नाम जपला ll५ll भिमेच्या तिरी असे भिमा शंकर… हो नाथा शंकर l धरणात गेले… धरणात गेले हो मंदिर तदनंतर ll६ll किरण भक्त असे सदा लेखणीत… देवा सदा लेखणीत l नाथाचं चरित्र देवा तुमच्या सेवेत… असे सदा सेवेत ll७ll जय देव जय देव.. जय किरते श्वरा… जय किरते श्वरा l भक्त आणि भाविक देवा… भक्त आणि भाविक देवा करती जागरा… हो जय देव जय देव जय ll धृ ll
………………………
संकल्पना- किरण बेंद्रे… शब्दांची मेजवानी… पुणे
Add Comment