दिपक ओहोळ यांना क्रांतीसुर्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी
दि.५ जानेवारी २०२५ रोजी फुले वाडा,पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मान्यवरांच्या हस्ते जगदिशब्द फाऊंडेशन चा क्रांतीसुर्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नेरले येथील शिक्षक श्री. दिपक भगवान ओहोळ यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.
यावेळी मंगेश चिवटे (मुख्यमंत्री सहायता कक्ष माजी प्रमुख),सुरेश खोपडे (माजी आय.पी.एस.अधिकारी),नितीन तळपादे (सिनेट सदस्य,पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ,सोलापूर),महादेव वाघमारे(अध्यक्ष,परिवर्तन संघटना) इ.मान्यवर उपस्थित होते.
जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान
जग बदलणारा बापमानुस या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन जगदिशब्द फाऊंडेशन च्या माध्यमातून केले होते.या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.