खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे जेऊर, माढा, केम येथे रेल्वे गाड्यांना थांबा; गणेश चिवटे
करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या माढा, जेऊर व केम या रेल्वेस्थानकावर तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. याचे अधिकृत पत्र रेल्वे खात्याच्या ऑफिसमधून आज प्रसिद्ध झाले आहे, जेऊर येथे कोणार्क एक्सप्रेस, केम येथे कन्याकुमारी एक्सप्रेस, व माढा येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले आहेत, अशी माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली आहे.
करमाळा तालुक्यातील केम व जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवाशांची अनेक दिवसांपासून होती.
हेही वाचा – भीषण अपघात; एसटी बसस्थानकात घुसली, 4 जण जखमी
मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावांचा विज पुरवठा सुरळीत
या मागणीसाठी प्रवाशांचे आंदोलनेही झाली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे.