केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान मध्ये प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे वाटप

केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान मध्ये प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे वाटप

केत्तर प्रतिनिधी :करमाळा सह इंदापूर,कर्जत,माढा,परांडा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या श्री किर्तेश्वर देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या ट्रस्टींनी घेतला आहे.प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा महाप्रसाद वाटप होणार आहे.श्री किर्तेश्वर देवस्थान हे पुरातन हेमाडपंथी स्वयंभू असून या मंदिराच्या मोडी शिला लेखा वरून हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

सन १९९६ साली येथे तेरा कोटी नामजप यज्ञ करण्यात आला होता.या यज्ञास करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या शंकर भारती यांची उपस्थिती लाभली होती.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दि.११/०९/२०२३ रोजी श्री किर्तेश्वर मंदिराचा भव्य असा कलशारोहण कार्यक्रमा संपन्न झाला.या कार्यक्रमास हजारो भाविक भक्त उपस्थित होते.केत्तूर व परिसरातील इतर भाविक भक्तांनी श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून देवस्थान परिसर सुशोभीकरण करून आयुर्वेदातील वृक्ष लागवड केली आहे.या देवस्थान चा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ग क मध्ये सामावेश झाला असून लवकरच ब वर्ग मिळणार असल्याचे माहिती ट्रस्टींनी दिली.

हेही वाचा – नेरले येथील हिंदवी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा समाजिक उपक्रम; वर्गणीतून बोअरवेल पाडून दिले

दहा हजारांची लाच घेताना करमाळ्यात कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडले

श्री किर्तेश्वर देवस्थानचा उल्लेख योग वाशिष्ठ,शिवलिला अमृत,काशिखंड या पौराणिक ग्रंथांत आढळून येतो.श्री किर्तेश्वर देवाची भक्ती मनापासून केल्यास यश,किर्ती मिळत असल्याचे भाविक भक्तांकडून सांगण्यात येते.

karmalamadhanews24: