अखेर चाळीस वर्षांच्या प्रत्येक्षे नंतर केत्तूर नं १ येथे पुनर्वसन खाते कडून विकास कामांना सुरूवात

अखेर चाळीस वर्षांच्या प्रत्येक्षे नंतर केत्तूर नं १ येथे पुनर्वसन खाते कडून विकास कामांना सुरूवात

केत्तूर – उजनी जलाशय करिता सन १९७५ साली केत्तूर गावचे भुमी संपादन होऊन केत्तूर नं १ व केत्तूर नं २ असे विभाजन झाले नंतर महाराष्ट्र शासन च्या पुनर्वसन विभागाकडून केत्तूर नं १ येथे अद्याप कोणत्याही स्वरूपाच्या प्राथमिकनागरी सुविधा मिळाल्या नव्हत्या.

केत्तूर नं १ ते केत्तूर नं २ या गावांना जोडणाऱ्या उजनी जलाशय वरील पुला साठी अनेक वर्षे केत्तूर नं १ येथील लोकांनी अनेक वर्षे संघर्ष केला तालुक्यातील अनेक नेते मंडळीनी पोकळ आश्वासने दिली.

अखेर सन २०१२ साली लोकवर्गणीतून या पुलाचे भरावाकाम करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून सन २०१६-१७ साली केत्तूर नं १-२ या पुलाचे काम करण्यात आले.परंतु केत्तूर नं १ येथील गावठाण रस्ते,स्मशानात भुमी शेड, नवीन ग्रामपंचायत कार्यालय,बस स्थानक,हे नागरी सुविधा चाळीस वर्षां पासून मिळाल्या नव्हत्या.

सन २०१७-१८साली माजी आमदार नारायण पाटील यांच्या पुढाकारातून हे कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु गावपातळीवरील काही अडचणी व कोरोना काळातील विकास कामांच्या स्थगिती मुळे हे काम थांबले होते.

हेही वाचा – ‘श्रीकमलादेवी पायथा ते खंडोबा मंदिर’ या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करा; मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सूचना

माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीतील केतुरच्या जलजीवन उद्घाटन कार्यक्रमाला सवितादेवी राजेभोसले गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुष्टी?

त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय येडे यांच्या आमरण उपोषण च्या नोटीसी नंतर पुनर्वसन विभागाला जाग आली या नंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी या बाबत योग्य ती दखल्या नंतर घेऊन संबंधित केत्तूर नं १ येथील विविध विकास कामांना सुरूवात झाली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line