केत्तूर येथील नेताजी सुभाष विद्यालयात विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी
केत्तूर (अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केतुर २ ता.करमाळा येथे दरवर्षीप्रमाणे प्रशालेचे प्राचार्य भिमराव बुरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांची आषाढी बालदिंडी पालखीसह गावातून काढण्यात आली.
करमाळा, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, वेणेगाव हा जुना पालखी मार्ग करण्याची मागणी
यावेळी विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या तसेच वारकऱ्यांच्या वेशामध्ये सहभागी झाले.दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदंगाच्या ठेक्यावरती पाऊल नृत्य केले.तसेच विद्यार्थिनींनी फुगड्यांचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी फेरीमध्ये वरूणराजाचाही आशीर्वाद लाभला.विठूनामाच्या गजरात सर्वजण तल्लीन झाले.यावेळी सर्व गुरूदेव कार्यकर्ते,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी, भजनी मंडळ सहभागी झाले.