केत्तूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन

केत्तूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन

केत्तूर (अभय माने) छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त केतुर येथे प्रथमता सकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.(ता.१५) रोजी भव्य निकाली कुस्त्याच्या आखाडा भरवणेत आला.

केत्तूरचे माजी सरपंच उदयसिंह मोरे – पाटील व उपस्थित मान्यवर याचे हस्ते या कुस्ती आखाड्याचे उद्धाटन करणेत आले. प्रथम कुस्तीचा विजेता समाधान पाटील( उप -महाराष्ट्र केसरी ) हे ठरले.

हेही वाचा – करमाळा येथील महिला नेत्या ॲड सविता शिंदे यांचा करमाळा ते कर्नाटक प्रवास! विधानसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला ते पाटील झाले चौथ्यांदा आमदार; नक्की वाचा ॲड.शिंदे यांचा अनुभव!

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

द्वितीय कुस्तीमध्ये सुहास गोडगे( महाराष्ट्र चॅम्पियन) विजेता ठरला असून तृतीय कुस्तीमध्ये शिवशंभु कुस्ती संकुल कंदरचा सतपाल सोनटक्के विजेता ठरला.

हे कुस्ती मैदाना यशस्वी रित्या पार पाडल्या बदद्ल संयोजक समितीच्या वतीने उदय -खाटमोडे पाटील यांनी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशितील कुस्ती शौकिनांचे आभार मानले.

karmalamadhanews24: