केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये पावसाची गाणी ही सदाबहार काव्य मैफल संपन्न
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी पावसाची गाणी हा सदाबहार काव्यमैफलीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रथम परमपूज्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कवी श्री सोमनाथ टकले व प्रसिद्ध कवयित्री कु. प्रज्ञा दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री सोमनाथ टकले यांनी आपली पावसावरील कविता विद्यार्थ्यांना ऐकवून, पाऊस आणि कवीचे नाते उलगडून सांगितले. यावेळी कवयित्री प्रज्ञा दीक्षित यांनी आपल्या पावसाच्या कवितेतून पावसाची निसर्गातील वेगवेगळी रूपे आणि मानवी भावभावना उलगडून सांगितल्या. यावेळी प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील या नवोपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील कु. हर्षदा पालवे, कु. सृष्टी पालवे, कु. तेजश्री कोळी, कु.प्रांजल कोळी, कु. धनश्री शिंदे, कु.सोनाली मोटे, कु.सानिका कोळेकर, कु.अनिता माने, कु.सानिया पठाण या विद्यार्थिनींनी तालासुरात पावसावरील विविध कवितांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सोनाली मोटे या विद्यार्थिनींने केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा . एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांची उपस्थिती होती.