आम्ही साहित्यिक करमाळा

नल्लामंदू वर लिहली गेलेली दोन्ही पुस्तके नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल; सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नल्लामंदू वर लिहली गेलेली दोन्ही पुस्तके नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल; सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

करमाळा (प्रतिनिधी आलिम शेख); सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ , इंडियन युथ असोसिएशन व शमा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार स्व. लतीफ नल्लामंदू यांच्या कार्याचा आलेख असलेल्या 

” शम – ए – कासिद – ” , व “अ . लतीफ नल्लामंदू : व्यक्तित्व व कर्तृत्व ” अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सोशल महाविद्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस,रविद्र बेडकिहाळ , ए आय मुजावर , विकार शेख ., यु एन . बेरीया, संयोजक अय्युब नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या थाटाने संपन्न झाला.

बहुभाषीक साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार स्व लतीफ नल्लामंदू यांच्या जीवनाचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे दोन उर्दू – मराठी पुस्तकांचा प्रकाशन करतना मला त्यांची जागल्याची भूमिके बदल अभिमान वाटतो . या बहुभाषिक पुस्तका मध्ये महाराष्ट्रातील नामवंत लेखकांनी त्यांचे कार्याचे भर – भरून कौतुक करत, त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्याची नोद घेतली आहे.

ही दोन्ही पुस्तके पुढची पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते . असे प्रतिपादन मा शिदे साहेब यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात केले .

मा . शिंदे पुढे म्हणाले – आज नल्लामंदू सारखे नि:स्वार्थी त्यागी पत्रकार मिळणे कठीण आहे  त्यांची आदर्श पत्रकारिता नवीन पत्रकारांना प्रेरणदायी आहे.

अ भा . मराठी साहित्य संमेलनाचे . माजी अध्यक्ष मा श्रीपाल सबनीस यांनी आपल्या विशेष शैलीत श्रोत्यांन मंत्रमुगद करत स्व .नल्लामंदू यांचा गौरवार्थ प्रसिद्ध झालेल्या दोन्ही पुस्तकातील लेखकांचा गौरव करत म्हणाले – कासिदकार स्वर्गीय लतीफ नल्लामंदू यांची पत्रकारिता इमानदार असल्याचा असंख्य साक्षी या ग्रंथात आहेत . कासिदची पन्नास वर्षाची तपश्चर्या त्यांच्या संपादकीय कारकिर्दीचे ऐतिहासिक मुल्य सिध्द करते .

ते एक सच्चे निष्ठांवत पत्रकार होते म्हणूनच त्यांनी अनेक आंदोलनात सहभागी झाले , पत्रकारांचा स्वतंत्र्यासाठी दंड भरून पड न काढता तुरंगवास स्विकारले . आज अशे ध्येयवादी पत्रकारांची गरज आहे .

ते पुढे म्हणाले – नल्लामंदू यांच्या वर लिहले गेली पुस्तक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे हे सर्वाना मान्य करावाच लागणार आहे .

 या वेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष मा . रविंद्र बेडकीहाळ , अभा उर्दू कॉन्फ्रसचे अध्यक्ष यु एन बेरीया ‘ बिझनेस एक्प्रेसचे ए आय मुजावर, खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार शेख, 

प्रा . अन्वर कमिशनर , माजी मुख्यध्यापक तजम्मुल चांदा यांनी “कासिदका”रां बदलचे आपल्या जुन्या आठवणीना उजाळा देत नल्लामंदूच्या निधनाने बहुभाषिक साहित्याची मोठी हानी झाल्याची खंत व्यक्त केली.

पत्रकार संघाचे सचिव प्रा पी पी . कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत अय्युब नल्लामंदू यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार शाल व बुके देऊन अबुबकर व कुद्दुस नल्लामंदु यांनी केला, तर उर्दू पुस्तक वर डॉ शफी चोबदार तर मराठी पुस्तकांवर प्राचार्य डॉ . इक्बाल तांबोळी  यांनी भाष्य केले . पाहुण्यांचा परिचय व सुंदर सुत्रसंचालन डॉ रशीद शेख यांनी केले, तर आभार डॉ शकील शेख यांनी मानले.

 या वेळी मा शिंदे यांच्या हस्ते सौ.शुभदा कुलकर्णी व रईसा मिर्जा या दो प्राध्यापिकांना “आदर्श शिक्षक ” म्हणून तर दोन्ही पुस्तकांचे मुखपृष्ठ बनविणारे सय्यद इक्बाल , तसेच इक्बाल बागबान , डॉ चोबदार , डॉ शकील शेख, डॉ . तांबोळी , डॉ रशीद शेख यांचाही शाल बुके देऊन विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी मजहर अल्लोळी , नजीर मुन्शी, हाजी अजब्बार नल्लामंदू , डॉ धोटेकर , हाजी जावीद बेलीफ , अझम सैफन’ विश्वनाथ साबळे, बशीर बागबान , डॉ उस्मान नल्लामंदू , भरतकुमार मोरे, फहमुन्निसा सय्यद,

 ज्येष्ठ , प्रा. मन्नान शेख, प्रा बशीर परवाज , फारुक कमिशनर ‘ जाफर बांगी , प्रा बी एच करजगीकर, ताहेर फडणीस, अस्लम सयद, खलील अल्लोळी, इंतेखाब फराश , सय्यद इरफान, इक्बाल तडकल , डॉ . सौ सुररया जहागीरदार इ . उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!