ब्रेकिंग; बंधन बँकेला काही बंधन आहे की नाही? करमाळा शाखेत पुन्हा आर्थिक घोटाळा; ३४ लाखांचा अपहार !
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथील बंधन बँकेच्या शाखेत सुमारे ११४ कर्जदाराच्या कर्जाच्या पैशातून तब्बल ३४ लाख रुपयांचा अपहार झाला असून याप्रकरणी व्यवस्थापक कॅशियर व इतर एक महिले विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे बंधन बँकेचे औरंगाबाद येथील विभागीय व्यवस्थापक मयूर भास्कर निखार यांनी या अपहाराची माहिती घेऊन काल पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.
याबाबतची माहिती अशी की एप्रिल 2023 ते जून 2023 दरम्यान करमाळा येथील बंधन बँके मधून एकूण ११४ कर्जदारांना ५०,३०,००० पन्नास लाख तीस हजार रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी बँक रेकॉर्डनुसार कर्जदाराच्या खात्यावर डिपॉझिट म्हणून प्रत्येक कर्जदाराच्या कर्जा मधून एक हजार रुपये ते तीन हजार रुपये रक्कम डिपॉझिट साठी कपात करून २,३२,०००/- रुपये ठेवून त्यांना १३,८३,०००/- रुपये देऊन मंजूर कर्जातील कर्जदार यांना ३४,१५,०००/- रुपये न देता स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता वापर केला.
त्याचप्रमाणे कर्जदार यांना कर्ज मंजूर करतेवेळी नियमबाह्य कर्ज मंजूर करून बँकेचे नियमाचे उल्लंघन करून बँकेची दिशाभूल केल्याबद्दल बंधन बँक करमाळा ब्रांच मॅनेजर सुजित विश्वास कॅशियर शेख व कर्जत जिल्हा अहमदनगर येथील एक महिला अशा तिघाविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे
यापूर्वी सदर बँकेमध्ये सन 2021 मध्ये दोन कोटी दहा लाखाचा घोटाळा झाला होता त्यावेळी बँकेतील तत्कालीन मॅनेजर राहुल मुंडे यांनी काही ग्राहकाशी संपर्क साधून व संगणमत करून दोन कोटी दहा लाख रुपयांची अपराथापर केली होती.
याच गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला श्री मुंडे फरार होता फेब्रुवारी 2022 मध्ये पोलिसांकडून त्याला अटक झाली होती नंतर जुलै 2023 मध्ये मुंडेना जामीन मंजूर झाला होता.
Add Comment