पारेवाडी गावावर आता सीसीटीव्हीची नजर
केत्तूर (प्रतिनिधी) : पारेवाडी (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय, पारेवाडी एसटी स्टँड चौक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गावच्या विकास कामांना अडथळा ठरणाऱ्या गोष्टींवर 24 तास नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून भविष्यात इतरही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहे.
त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होत आहे. अशी माहिती पारेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ वंदनाताई हनुमंत नवले यांनी दिली.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती व अंगणवाडी गुंडगिरे वस्ती येथे रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम झाले आहे.गावातील ग्रामपंचायत विहिरीतील गाळ काढून नियोजित पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
भविष्यातही प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील अंतर्गत रस्ते या कामाची पूर्तता करण्यात येणार आहे.
Add Comment