केम – भोगेवाडी रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
केम (प्रतिनिधी संजय जाधव):
केम -भोगे वाडी जुन्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता त्वरीत करावा अशी मागणी भोगे वाडी ता,माढा येथील पोलिस पाटील सुरेश पाटील यानी सोलापूर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, केम- भोगेवाडी हा जुना रस्ता आहे. याचे अंतर चार किलोमीटर आहे. केम भोगे वाडी रस्ता बिचितकर वस्ती ते भोगे वाडी या रस्त्यावरील संपूर्ण खडी ऊघडि पडली आहे. या रस्त्यावरून गाडया चालवताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून गाडया चालवाव्या लागतात. तसेच रस्त्यात खड्डा आहे की खडयात रस्ता हेच समजत नाही.
भोगे वाडी येथील नागरिकांचे केम गावावर आवक जावक अवलंबून त्यामुळे नागरिकांना केम येथे बाजार व दवाखान्यासाठी ये जा करावी लागते. रात्री अपरात्री या रस्त्यावरून गाडया चालवताना मोटार सायकली घसरून लहान मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना या रस्त्यावरून पायी सुध्दा नीट चालता येत नाही. आणी विशेष म्हणजे हा रस्ता पटाडाच्या शिवारातून जात असल्याने ऊंचावर आहे, त्यामुळे या रस्त्याचाजेष्ठ नागरिक विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच केम येथील प्रवाशांना कुर्डूवाडी जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या रस्यावर मोटार सायकल , टेंपो यांची वर्दळ असते. भोगेवाडी सारख्या सैन्याच्या गावाला रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथील प्रत्येक घरातील एक सैनिक देश सेवा करीत आहे. अशा गावाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
Add Comment