उजनी धरण भरणार की नाही याबाबत साशंकता : लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
केत्तूर (अभय माने) : पुणे जिल्हा व परिसर तसेच घाटमाथा व धरण साखळीत पाऊस ओसरला असल्याने उजनी धरणाच्या पाणी साठ्यात होणाऱ्या वाढीला ब्रेक बसला आहे तर ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार की नाही ? याबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने. उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडा फट्ट गेल्यानंतर जुलै म महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे मानस 36 टक्के वर असलेले उजनी धरणाचा पाणीसाठा सध्या अधिक 12 टक्के पर्यंत येऊन ठेपला आहे त्यामुळे चिंता वाढली आहे पावसाळा सुरू झाल्यापासून दमदार व मुसळधार पाऊस झाला नाही लाभ क्षेत्रात रिमझिम पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात तण वाढल्याने संकट निर्माण झाले आहे.
यावर्षी पावसाळ्याला उशिराने सुरुवात झाली असली तरी जुलै महिन्यात धरण क्षेत्रात (लाभक्षेत्र वगळता) गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे परंतु या पावसाने आता ब्रेक घेतला आहे या पुढील काळात पाऊस कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंता मात्र वाढली आहे.
Add Comment