बारामतीच्या ऐतिहासिक शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

बारामतीच्या ऐतिहासिक शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

करमाळा(प्रतिनिधी); खा. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारामती शहरात आयोजित करण्यात येणारी, 40 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या ‘शारदा व्याख्यानमालेत’ करमाळ्याचे सुपुत्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे लेखक, व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 3 मे 2024 रोजी सायंकाळी त्यांचे व्याख्यान होणार आहे.

बारामतीची शारदा व्याख्यानमाला ही खूप ऐतिहासिक व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेस आजवर राज्यातील व राज्याबाहेरील अनेक महान विचारवंत, लेखक, संपादक कलावंत यांनी हजेरी लावलेली आहे. 

अशा व्याख्यानमालेत युवा लेखक जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान बारामतीकरांना ऐकण्याची नामी संधी आहे, तरी नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line