करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी टँकर साठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करा: मा.आ.नारायण पाटील यांचे आवाहन

करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी टँकर साठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करा: मा.आ.नारायण पाटील यांचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी)
टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. करमाळा तालुक्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेऊन आज पाटील गटाकडून कार्यकत्यांनी या बाबतीत लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की ज्या गावात व गवस जोडलेल्या वाडी वस्तीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असेल तर ग्रामसेकांमार्फत सादर गाव अथवा वाडी वस्ती साठी तातडीने प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठवावे. सदर प्रस्तावातील त्रुटी दूर करून योग्य प्रस्ताव मंजूर करून सदर ठिकाणची पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जिल्हाधिकारी महोदयांनी प्रशासनास सदर कामाबाबत सूचना दिल्या असून प्रशासकीय स्तरावरून देखील या कामास सुरुवात झाली आहे.

तरी स्थानिक स्वराज संस्थेत अर्थात ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सरपंच, उपसरंपंच तसेच सदस्य यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या लक्षात या टंचाईची दाहकता लक्षात आणून द्यावी.

प्रशासकीय स्तरावर प्रस्ताव मंजुरी साठी अडचणी आल्यास आपण स्वतः या बाबतीत पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल जल्लोष

करमाळा येथे तपश्री च्या पुढाकाराने नेत्र शिबिर संपन्न; आजवर 4500 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

तसेच पाणी टंचाई समस्या अधिक तीव्र होण्यापूर्वीच प्रशासकीय कामांना गती आली पाहिजे व मागणी तिथे टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जावा म्हणून आपली शासनाकडे आग्रही भूमिका राहणार आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय तर केलीच जावी.

परंतु जनावराच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सिंगल फेज लाईट खंडित केली जाऊ नये अशी सूचनाही आपण महावितरण विभागास केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

karmalamadhanews24: