करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र व्हावे यासाठी मा. आ. नारायण आबा पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना साकडे

करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र व्हावे यासाठी मा. आ. नारायण आबा पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना साकडे

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र व्हावे यासाठी नारायण (आबा) पाटील यांनी राज्याच्या प्रमुखांना साकडे घातले असून नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले.

करमाळा तालुक्यातील केळी या पिकाचे वाढते उत्पादन लक्षात घेऊन मागील काही वर्षापासून माझी आमदार हे केळी संशोधन केंद्र बावत सतत मागणी करत आहेत.यामुळे आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रत्यक्षात या कामाची गरज का आहे हे मागील दोन वर्षाचा पीकपाणी अहवाल मांडून पटवून दिली.

सन २०२१-२२ मध्ये ६७६१ हेक्टर क्षेत्रावर केळी उत्पादन घेण्यात आले तर सन २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन केळी लागवड क्षेत्र हे ६९७८ हेक्टर क्षेत्रावर जाऊन पोहचले. या भागातील केळी उत्पादन क्षमता ही सरासरी हेक्टरी ६९ टन इतकी आहे. जवळपास  ६४ हजार मेट्रिक टन केळी या भागातून बाजारपेठेत जाते.

यामुळे या भागातील केळी उत्पादकांना तसेच राज्यातील केळी उत्पादकांना केळी बाबत नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन याबाबत माहिती मिळावी आणि जेणेकरून केळी उत्पादन वाढून जागतिक बाजापेठेत राज्यातील केळीला मागणी असावी यासाठी शेलगाव (वांगी) ता. करमाळा येथे एक केळी संशोधन केंद्र व्हावे ही मागणी या निवेदनातून केली आहे.

हेही वाचा – सातोली येथे उसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्यावरून पिता-पुत्राला मारहाण करत खिशातील रक्कम घेतली काढून; करमाळा पोलिसात १० जणांवर गुन्हा दाखल

कुऱ्हाडीने काकाचं मुंडकं तोडलं अन् बाईकवर घेऊन पुतण्या गावात फिरला, जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने माढ्यात खळबळ!

या संशोधन केंद्रासाठी जागेची उपलब्धता असून जवळपास ३८ हेक्टर जमीन ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची येथे असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पटवून दिले.

यावर आता दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांच्या या मागणीला महत्व असल्याचे दिसून येत आहेत. तर या कामाचा पाठपुरावा आपण निरंतर चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

karmalamadhanews24: